कापूरहोळ (राजतोरण न्युज):
पर्यावरण प्रेमी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कृपाआशीर्वादाने भोर तालुका तहसील कार्यालयाच्या इमारतीवर गेल्या काही वर्षांपासून पिंपळाचे झाड दिमाखात आणि जोमात बहरत आहे.विशेष म्हणजे भोर तहसीलदार यांचे खुर्ची खाली झाडाच्या मुळ्या गेल्या असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.भोर तालुका ,डोंगर , धरणे, किल्ले , याच बरोबर राजवाडा चौकात जुनी ऐतिहासिक इमारतसाठी ओळखला जातो. भोर तालुक्याचा शासकीय कारभार याच इमारतीतून चालतो त्यामुळे या इमारतीला विशेष महत्त्व आहे. तहसीलदार यांचे कार्यालयाच्या खिडकीतून हे झाड डोकावत असून कार्यालयात वाढीव प्राणवायूचा पुरवठा केला जात असल्याचे दिसून येते.
सर्वसाधारणपणे शेतकरी आणि नागरिकांनी जाणीव पूर्वक झाड लावले तर त्यांला वरचेवर खतपाणी द्यावे लागते ,तरी ते झाड जगविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पण म्हणतात "ना देव तारी त्याला कोण मारी" या म्हणी प्रमाणे या झाडाला खतपाणी द्यावे लागत नाही.तरीही तो वृक्ष बाराही महिने हिरवागार असतो .राजवाडा चौकात नागरिकांची आणि पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते नागरिक राजवाडा चौकात आल्यावर त्यांच्या दृष्टीस प्रथम हा वृक्ष येतो आणि त्याचा फोटो आपले कॅमेऱ्यात टिपतात.
भोर तालुका दुय्यम निबंध आणि तहसीलदार यांना जोडणारा दुवा म्हणजेच हा वृक्ष आहे.गेली अनेक वर्षांपासून पिंपळाचे झाड दिमाखात डौलात असून त्याने इमारतीचा काही भाग मोडकळीस आला आहे.त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून झाडाला वाढणेस भरपूर वाव दिला आहे. त्यामूळे भोर तालुक्यातील निसर्ग प्रेमीकडून सर्वांचे कौतुक होत आहे. कार्यतत्पर अधिकारी आणि कर्मचारी याचे आपले कार्यालयावर आणि कामावर किती प्रेम आहे हे यावरून दिसून येत आहे.
राजतोरण न्यूजच्या नवीन बातम्यासाठी खालील व्हॉटसअप ग्रुपवर क्लीक करून सामील व्हा