काळूबाई दर्शनासाठी जात असताना काळाचा घाला

Rajtorannews

काळूबाई दर्शनासाठी जात असताना काळाचा घाला

पुणे-सातारा महामार्गावर सारोळा गावच्या हद्दीत अपघातात एकाचा जागीच मृत्यू

कापूरहोळ  

काळूबाई दर्शनासाठी सहकुटुंब निघालेल्या एका व्यक्तीचा सारोळे (ता. भोर) गावच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्ग ओलांडताना   अपघात होवून जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी (दि. २९ नोव्हेंबर) रोजी सकाळी  अकराच्या सुमारास घडली. सदर घटनेत उत्तम झेंडे (वय अंदाजे ५५ वर्ष, रा. वडकी, ता. हवेली) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, झेंडे कुटुंबीय हे काळूबाई  दर्शनासाठी   दोन गाड्यांसह पुण्याहून सातारच्या दिशेने निघाले होते. पुणे-सातारा महामार्गावर सारोळे गावच्या हद्दीत हॉटेल मल्हार समोर त्यातील एका गाडीचा टायर पंक्चर झाला. यावेळी मृत उत्तम झेंडे हे दुसऱ्या गाडीत पुढे निघून गेले होते. टायर पंक्चर झाल्याचा फोन येताच ते गाडीसह पुन्हा वळून सातारा कडून पुण्याच्या दिशेने आले.  रस्ता ओलांडत पंक्चर झालेल्या गाडीकडे  जात असताना सातारा कडून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने(के.ए.२२ ए.ए.४३६३) त्यांना जोराची धडक दिली. हा 

अपघात  एवढा जोरात होती की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांसमोर झालेल्या या अपघाताने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस, महामार्ग पोलीस व आर. टी. ओ. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. राजगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी भोर उपविभागीय रुग्णालयात पाठवला आहे. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.



To Top