पुणे सातारा महामार्गावर कार-कंटेनरचा अपघात चार जण जखमी

Rajtorannews




का
पूरहोळ

पुणे-सातारा महामार्गावर कामथडी तालुका भोर च्या हद्दीत देगाव फाटा येथे पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारा कंटेनर (एमएच 46 बीयू 1863) आणि कार (एमएच 09 जीयू 0334) यांच्यात शनिवारी दिनांक ३० रोजी सकाळी ९ च्या दरम्यान भीषण अपघात होऊन चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, पुणे - सातारा महामार्गावर चेलाडी उड्डाणपूल संपताच मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या कार क्र एम. एच ०९ जी. यू. ०३३४ ला पाठीमागून येणारा औषधाने भरलेला कंटेनर क्र. एम. एच ४६ बी. यु १८६३ वरील चालकाचे नियंत्रण सुटून कारला धडक देत थेट कामथडी हद्दीतील महामार्गावरील दोन पुलाच्या मधोमध कंटेनर लटकला.या अपघातात कार मधील सर्जेराव सखाराम पाटील वय ६०, (पत्नी) बायक्का सर्जेराव पाटील व ५०, (मुलगा) प्रवीण सखाराम पाटील वय ३५, (नात) इरा पाटील वय साडेतीन वर्ष (सर्व रा. दरेवाडी, ता. पन्हाळा, जि कोल्हापूर) जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमीना सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले . महामार्गावर एक पदरी लेन निर्माण झाल्याने देगाव फाटा ते वरवे आणि खुटवड वस्ती पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी अपघातातील कार व कंटेनर क्रेनच्या मदतीने बाजूला करून महामार्गावर वाहतूक सुरळीत केली. अधिकचा तपास राजगड पोलिस करीत आहेत.

To Top