कापूरहोळ
राज्यातील नव्हे तर देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र नारायणपूर ता. पुरंदर जिल्हा पुणे येथे परमपूज्य श्री सदगुरू नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व परमपूज्य टेबे स्वामी महाराज यांच्या आधीपत्याखाली शुक्रवारी (दि. १३) पासून सलग तीन दिवसांचा श्री दत्तमहाराज जयंती सोहळा सुरू होत आहे.
श्रीक्षेत्र नारायणपूचे वैशिष्ट्य म्हणजे येथील श्रीदत्तांची मूर्ती ही एकमुखी 卐 आहे. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी हिवरे येथील आजोळ ज्योतिचे स्वागत आणि अखंड प्रजोलीत यज्ञकुंडाचा २४वा वर्धापन दिन साजरा करण्यात येऊन रात्री मंदिरात आरती होणार आहे. तर शनिवारी (दि. १४) हा मुख्य दिवस असून दुपारी दोन वाजल्या पासून येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत करून श्री दत्तमहाराज यांचा जयंती सोहळा सायंकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी पार पडल्यानंतर सुंठवडा व महाप्रसाद दिला जाणार आहे. रविवारी (दि. १५) पहाटे ४ ते ६ रुद्राआभिषेक करून सकाळी ९ वाजता श्री दत्त महाराजांची पालखीतून ग्राम प्रदक्षिणा होईल आणि दुपारी १.३० वाजता प्रवचन होऊन आरती व महाप्रसाद केला जाईल, असे श्री क्षेत्र नारायणपूरचे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले आहे.