भोर तालुका महायुतीच्या वतीने भोर विधानसभा नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांचा जाहीर सत्कार व मतदारांचे आभार ,मेळाव्याच्या आभार कार्यक्रम आयोजित केला होता.सत्काराला उत्तर देताना आमदार मांडेकर यांनी महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी दिलेल्या शब्द खरा करून दाखवला असे म्हणत सर्वांचे आभार मानले. आणि १६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत असून मंत्रीमंडळाचा विस्तार होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेऊन भोर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार मांडेकर यांनी दिली.ते पुढे म्हणाले की ,सारोळा शिंदेवाडी ते भोर महाड रस्ताचे चौपदरीकरण काम ,औद्योगिक वसाहतीचा प्रश्न,बंद पडलेले उदयोग पुन्हा सुरु करणे , ही कामे प्राधान्याने हाती घेऊन रायेश्वर, तोरणा व राजगडवर ध्वज उभारण्याचे काम प्रगतीपाथावर असल्याचे त्यांनी सांगितले. विकास कामात राजकारण न करता विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मांडेकर यावेळी म्हणाले.
२५ वर्षांनंतर तालुक्याला हक्काचा आमदार मिळाला आहे.मुळशी तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यामुळे शंकर मांडेकर यांचा विजय झाला आहे. मात्र, भोर आणि वेल्हा (राजगड) जिल्हापरिषद गटातून कमी झालेले मतदान सुधारावे लागेल, असे चंद्रकांत बाठे म्हणाले.
तालुक्यात परिवर्तनाची लाट होती. २५ वर्षानंतर आपल्या हक्काचा आमदार मिळाला आहे. भोर तालुक्यात पर्यटन विकास औद्योगिक वसाहत हि कामे करावी लागणार आहेत. प्रस्थापितांच्या विरोधात जि. प,पं. स आणि न. पा. निवडणुकीत काम करावे लागेल, असे विक्रम खुटवड यांनी सांगितले.
या प्रसंगी आमदार शंकर मांडेकर, भालचंद्र जगताप, रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, शरद ढमाले, संतोष घोरपडे, बाळासाहेब गरुड, विश्वास ननावरे,जीवन कोंडे, केदार देशपांडे, किरण राऊत, सुनिल भेलके, बाळासो गरुड, यशवंत डाळ, स्वाती गांधी, दिपाली शेटे, गणेश निगडे, गणेश मसुरकर, दशरथ जाधव, बाळासो खुटवड, एकनाथ रोमण, सोमनाथ ढवळे, संदीप शेटे, कुनाल धुमाळ, प्रविण जगदाळे, अविनाश गायकवाड, राजेंद्र गुरव, नितिन थोपटे, सचिन कन्हेरकर, विलास वरे, अतुल काकडे, सतिष चव्हाण, पल्लवी फडणीस यांचे सह महायुतीमधील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.