लसूण चारशे पार ..ग्राहकांच्या बजेटला फोडणी

Rajtorannews
कापूरहोळ
गेली काही महिन्यात लसूण बाजारात रुसला असून त्याने किरकोळ विक्रीत चार्शेपार आकडा गाठला आहे.त्यामुळे गृहिणीचे बजेट कोलमडले असून लसूण स्वस्त होण्याची अपेक्षा गाऱ्हकांकडून व्यक्त केली जात आहे.
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यात मोठ्या प्रमाणात लसणाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, मागील दोन वर्षे लसणाला दर न मिळाल्याने  लसूण क्षेत्रात मोठी घट झाली. शेतकऱ्यांनी लसणाऐवजी इतर पिकाला प्राधान्य दिले त्यामुळे उत्पादन घटले. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील बहुतांश बाजारपेठांमध्ये लसणाचा तुटवडा जाणवत असून मागील काही दिवसांपासून घाऊक बाजारात लसणाला उचांकी दर मिळत आहे. किरकोळ बाजारात एक किलो लसणाचा दर ४०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातून लसूण गायब झाला आहे. वरणातून हळूहळू लसूण गायब झाल्याने वरण फिके होत आहे, तर पाले भाज्याना फोडणी देणे कठीण झाले आहे.त्यामुळे गृहिणी रोजभाजी काय करावी याची चिंता व्यक्त करीत आहेत.
हॉटेल मध्ये भाज्यातून लसूण दिसेना तर 
'लसूण फ्राय'चं नाव काढायचं नाही.
बाजारात लसूण महाग झाल्याने हॉटेलमध्ये  'लसूण फ्राय' डिश मिळेनाशी झाली आहे. वाढत्या महागाईमुळे हॉटेल व्यावसायिकांना ही लसूण परवडत नाही. यामुळे 'लसूण फ्राय'चं बंद आहे अशा आशयाचे फलक काही हॉटेल व्यावसािकांनी लावले आहेत.

घरगुती मसाल्याची कामे लांबणीवर...
- लसून ४०० रुपये किलो झाल्याने १०० रुपयांना पावशेर त्यापण ४ ते ६ लसणाचे कांदे येत असल्याने घरात महिलांना मसाल्यात लसूण घालता येईना. त्यात घरगुती मसाला करायचा झाल्यास लसूण लागतोच, सध्या बाजारात मिठाव्यतिरिक्त मसाल्यात काहीच स्वस्त राहिले नाही.
गेल्या काही महिन्यांपासून बाजारात मागणीच्या तुलनेत लसणाची आवक कमी होत आहे. त्यामुळे लसणाला उच्चांकी दर मिळत आहे. यापुढे आणखी दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. -  
अमोल राऊत , भाजीपाला व्यापारी

To Top