हरिश्चंद्री ग्रामस्थांच ठरलय पुन्हा आंदोलन

Rajtorannews

अधिकारी आणि ठेकेदारांची तारीख पे तारीख , तारीख पे तारीख

भुयारी मार्गासाठी लढा 

भुयारी मार्गाचे काम तात्काळ सुरू करा.

कापूरहोळ

पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील हरिश्चंद्री ता.भोर येथील भुयारी मार्गासाठी हरिश्चंद्री गावचे ग्रामस्थ गेली दहा वर्षा पासून लढा देत आहेत.चुकीच्या पद्धतीने महामार्गाचे आरेखन आणि काही राजकीय नेत्यांनी केलेल्या हस्त क्षेपामुळे हरिश्चंद्रीकरांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे असा आरोप नागरिकांनी वारंवार केला होता. गावातील तरुण युवक आणि नागरिकांनी गेली दहा वर्षे याला वाचा फोडून संगर्ष केला .राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील हरिश्चंद्री फाट्यावर अखेर भुयारी मार्गाचे कामाला २२ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरुवात होणार असल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पश्चिम महाराष्ट्राचे अधिकारी राजेश कदम यांनी हरिश्चंद्री ग्रामस्थांना दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजी दिले होते त्यावर कामाचे शुभारंभ उद्घघाटण तत्काळ केले परंतु गेली आकरा महिने उलटून गेली तरी कामात काडीमात्र प्रगती नाही की, कोठे खड्डा खोदला नाही. समबंधित अधिकारी गावच्या नागरिकांची समजूत घालत तारीख पे तारीख देत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाला कळविले आले.
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग हा हरिश्चंद्री गावाच्या हद्दीमधून गेल्यामुळे हरिश्चंद्री ग्रामस्थांना दळण वळण करण्यासाठी मोठी अडचण झाली आहे.रस्त्यावरून शेतीच्या मशागतीच्या कामासाठी अलीकडे पलीकडे जाणे येणे , शेती मश्यागत करण्यासाठी लागणारी औजारे महामार्गाच्या पलीकडील बाजूला नेणे , गुरांना चाऱ्यासाठी रस्त्यापलिकडे जानेसुधा अवघड झाले आहे. गावातील नागरिकांना बाजारपेठेत जाणे लहान मूलांना शाळेत जाण्यासाठी महामार्गावरूनच जीव मुठीत घेऊन जावे यावे लागत आहे. गावातील ७ ते ८ नागरिकांचा या ठिकाणी अपघात होऊन त्यांचे संसार उद्धवस्त झाले. हरिश्चंद्री ग्रामस्थांनी गेली १० वर्षे आंदोलनाचा पवित्रा घेत उपोषण, शोले स्टाईल पाणी टाकीवर आंदोलन,रास्ता रोको , अशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून भुयारी मार्गासाठी लढा सुरू ठेवला आहे.
           हरिश्चंद्री भुयारी मार्गाचे काम तात्काळ सुरू करावे म्हणून१५ डिसेंबर २०२४ रोजी हरिश्चंद्री ग्रामस्थ बहुसंख्येने लक्ष् वेधी आंदोलन करणार असल्याचे प्रशासनाला कळविण्यात आले आहे तसेच हरिश्चंद्री/कापूरहोळ गावातील ग्रामस्थ , शाळकरी मुले , कामानिमित्त सर्विस रस्त्यावरून ये-जा करत असतात. महामार्गावरील अतिक्रमणामुळे सर्विस मार्गावर मोठ्यप्रमाणावर त्रास होत आहे. राष्ट्रिय महामार्गावर भूसंपादित केलेली दोन्ही बाजूची जमीन ,रस्ता तात्काळ मोकळा करून पादचारी मार्गाची व्यवस्था करांवी असे ही ग्रामस्थांनी प्रशासणाला सूचित केले आहे.
To Top