१० वर्षाच्या लढ्याला यश दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात
हरिश्चंद्री ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित
कापूरहोळ
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील हरिश्चंद्री ता.भोर येथील भुयारी मार्गासाठी हरिश्चंद्री गावचे ग्रामस्थ गेली दहा वर्षा पासून लढा देत होते.चुकीच्या पद्धतीने महामार्गाचे आरेखन आणि काही राजकीय नेत्यांनी केलेल्या हस्त क्षेपामुळे हरिश्चंद्रीकरांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला होता असा आरोप गावच्या नागरिकांनी वारंवार केला होता. गावातील तरुण युवक आणि नागरिकांनी गेली दहा वर्षे याला वाचा फोडून संगर्ष केला .आज दुपारी दोन वाजता महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम ,सुभाष घंटे, निखिल कंट्रक्शन, चे इंजिनिअर यांनी मशिनरी आणून खोद काम सुरू केले त्यामुळे आंदोलक राम शिवाजी पाचकाळे. संतोष तानाजी गाडे. रामचंद्र निवृत्ती गाडे मारुती जिजाबा गाडे व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि ग्रामस्थांनच्या वतीने अधिकाऱ्यांचां शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील हरिश्चंद्री फाट्यावर अखेर भुयारी मार्गाचे कामाला २२ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरुवात होणार असल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पश्चिम महाराष्ट्राचे अधिकारी राजेश कदम यांनी हरिश्चंद्री ग्रामस्थांना दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजी दिले होते त्यावर कामाचे शुभारंभ उद्घघाटण ११ महिन्यापूर्वी केले परंतु गेली आकरा महिने उलटून गेली तरी कामात काडीमात्र प्रगती नव्हती, तर समबंधित अधिकारी गावच्या नागरिकांची समजूत घालत तारीख पे तारीख देत होते. त्यामुळे नागरिकांनी १५ डिसेंबर रोजी पुन्हा आंदोलन करणार असल्याचे प्रशासनाला कळविले होते.
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग हा हरिश्चंद्री गावाच्या हद्दीमधून गेल्यामुळे हरिश्चंद्री ग्रामस्थांना दळण वळण करण्यासाठी मोठी अडचण झाली आहे.रस्त्यावरून शेतीच्या मशागतीच्या कामासाठी अलीकडे पलीकडे जाणे येणे , शेती मश्यागत करण्यासाठी लागणारी औजारे महामार्गाच्या पलीकडील बाजूला नेणे , गुरांना चाऱ्यासाठी रस्त्यापलिकडे जाने अवघड झाले आहे. गावातील नागरिकांना बाजारपेठेत जाणे लहान मूलांना शाळेत जाण्यासाठी महामार्गावरूनच जीव मुठीत घेऊन जावे यावे लागत आहे. गावातील ७ ते ८ नागरिकांचा या ठिकाणी अपघात होऊन त्यांचे संसार उद्धवस्त झाले. हरिश्चंद्री ग्रामस्थांनी गेली १० वर्षे आंदोलनाचा पवित्रा घेत उपोषण, शोले स्टाईल पाणी टाकीवर आंदोलन,रास्ता रोको , अशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून भुयारी मार्गासाठी लढा सुरू ठेवला होता.
हरिश्चंद्री भुयारी मार्गाचे काम आंदोलनाच्या इशाऱ्या नंतर आज दुपारी २ वाजल्या पासून तात्काळ सुरू केले त्यामुळे १५ डिसेंबर २०२४ रोजी हरिश्चंद्री ग्रामस्थ वतीने आयोजित लक्ष् वेधी आंदोलन स्थगित केल्याचे प्रशासनाला कळविण्यात आले आहे.