भोर तालुका स्तरीय प्रवचन स्पर्धा संपन्न

Rajtorannews

 वारकरी सांप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयोजन 


कापूरहोळ
वारकरी सांप्रदायाच्या सेवेसाठी व भोर तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता आणि संत चरित्र व ग्रंथांचा प्रचार ,प्रसार,अभ्यास होण्यासाठी भोर तालुका स्तरीय प्रवचन स्पर्धा  वय वर्ष १० ते १४ आणि  वय वर्ष १५ ते १८ अश्या दोन वयोगटात स्पर्धा रघुकुल प्रतिष्ठान करंदी खे बा व वारकरी सेवा संघ भोर तालुका वतीने घेण्यात आली होती. प्रवचन स्पर्धा अंतिम फेरी व बक्षीस समारंभ रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी करंदी खे बा. येथील आश्रमामध्ये संपन्न झाला.

याप्रसंगी रघुकुल प्रतिष्ठान व वारकरी सेवा संघ भोर तालुका सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ व स्पर्धक तसेच तालुक्यातील वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थी, गुरुजन  आणि बक्षीस सौजन्य देणारे सन्माननीय देणगीदार तसेच वारकरी सेवा संघ इंदापूर तालुकाध्यक्ष दत्तात्रेय भोईटे , दौंड तालुका सचिव  खताळ,जाधव पुरंदर तालुका वतीने गायकवाड यांचे सह मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल प्रतिमा व व्यासपीठ आणि ग्रंथ पूजनाने करण्यात आली.अंतिम फेरीतील 10 निवडक विद्यार्थ्यांनी प्रवचन सादर केले. व सायंकाळी  विजेते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.लहान गट ...प्रथम क्रमांक  शिवराज पंढरीनाथ जाधव, द्वितीय क्रमांक सोहम सखाराम गोगावले तृतीय क्रमांक स्वरदा संदीप मुसळे उत्तेजनार्थ नचिकेत अनिल सुतार उत्तेजनार्थ रुपेश जिमाजी गोरे  तसेच मोठा गट प्रथम क्रमांक अथर्व अंकुश टोळे, द्वितीय क्रमांक साईराज सुनील साने तृतीय क्रमांक ज्ञानेश्वरी अंकुश यादव उत्तेजनार्थ अर्चना दीपक कुमकर उत्तेजनार्थ यश विजय पाडळे या स्पर्धकांना  रोख रक्कम  ट्रॉफी व भगवद्गीता ग्रंथ आणि शाल श्रीफळ  प्रमाणपत्र सन्मानपूर्वक  बक्षीस सौजन्य देणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी स्पर्धाकानी सुंदर प्रवचन सेवा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या प्रसंगी ह.भ.प.संजय महाराज बोरगे यांनी बोलताना आयोजित प्रवचन स्पर्धेचा हेतू उद्देश व परीक्षण पद्धती बद्दल उपस्थि ताना मांहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी नाईलकर(भोर ता.अध्यक्ष )व  दिलीप खुडे( पुणे जिल्हा सचिव) यांनी केले तर स्वागत उपाध्यक्ष  पंढरीनाथ जाधव व सदस्य  विष्णू चंदनशिव , संदीप मुसळे यांनी केले तर आभार सतीश कोंडे यांनी मानले. 

या स्पर्धेसाठी रघुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलासराव बोरगे आणि सर्व पदाधिकारी सदस्य व वारकरी सेवा संघ भोर तालुका अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्य यांनी गेली दोन महिने  विषेश परिश्रम घेतले.
To Top