भोर तालुक्यात थंडीचा कडाका

Rajtorannews

 सकाळ-संध्याकाळी  शेकोट्या पेटू लागल्या


 कापूरहोळ

भोर तालुक्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. नागरिकांना हुडहुडी भारत असून थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपडे घालने पसंत करीत आहे. बहुतांशी लोकांकडून सकाळी व सायंकाळी शेकोट्या पेटवून थंडी घालवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तालुक्यात सध्या 8ते10 अंश सेल्सिअस तापमान असून थंडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. थंडीचा उपयोग रब्बीतील पिकांना होणार असला तरी नागरिक गारठले आहेत. थंडी वाढल्यामुळे शेती कामावर याचा परिणाम झाला आहे. चिमुकल्यासह वयोवृद्द थंडीपासून बचावासाठी वर्षभर घरात पडून असलेल्या स्वेटर, कानटोपी, मफलर या उबदार कपड्यांचा वापर करू लागले आहेत. आजुन महिना भर थंडी राहणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. 

बदलत्या वातारणामुळे नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान वाढत्या थंडीत आजाराचे प्रमाण कमी होते असे म्हटले जात असले तरी सध्या तालुक्यात रुग्ण संख्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

" मागील चार पाच दिवसांपासून थंडी वाढल्यामुळे नागरिक गारठले आहेत. मात्र या थंडीचा फायदा रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे."

"मोबाइलमध्ये अडकलेली आजची पिढी शेकोटीच्या निमित्ताने घराबाहेर पडताना दिसते. शेकोटीतून एकमेकांशी संवाद साधला जात असून व शेकोटीची हवीहवीशी ऊब घेताना ते दिसत आहेत."

To Top