रघुकुल प्रतिष्ठान आयोजित विद्यार्थ्यांचे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Rajtorannews
कापूरहोळ

वारकरी सेवा संघ भोर तालुका व रघुकूल प्रतिष्ठान करंदी खे.बा.यांच्या वतीने श्री.संत रोहिदास महाराज पुण्यतिथी निमित्त मिनाताई रामभाऊ गाडेकर यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांचे संपूर्ण आरोग्य तपासणी व दातांची तपासणी व औषधोपचार शिबिर घेण्यात आले, यावेळी
डॉ प्रगती कदम पाटील( बी एच एम एस )
डॉ प्रशांत कदम( एमडी बालरोगतज्ञ)
डॉ वैभव पाटील ( बीडीएस दंतरोगतज्ञ)
या तज्ञ डॉक्टरांनी ७२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार टॉनिक गोळ्या व दातांच्या स्वच्छतेसाठी साहित्य ब्रश-पेस्ट विद्यार्थ्यांना दिली तसेच मीनाताई रामभाऊ गाडेकर या कुटुंबीयांच्या वतीने सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना जर्किन्स सप्रेम भेट देण्यात आली.
रघुकुल प्रतिष्ठान संस्थापक.विलास बोरगे व वारकरी सेवा संघ भोर तालुका अध्यक्ष .तानाजी नाईलकर तसेच उपाध्यक्ष .पंढरी जाधव व जिल्हा सचिव .दिलीप खुडे यांच्या हस्ते गाडेकर कुटुंबियांचा शाल श्रीफळ देऊन व श्री विठ्ठल व श्री ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.शिबिराचे नियोजन ह.भ.प.संजय महाराज बोरगे(अध्यक्ष वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा) यांनी केले .

To Top