कापूरहोळ
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडुन रील्स, व्हीडीओ,आणि सोशल मीडिया मधून वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असुन याबाबत वेगवेगळ्या स्तरावरुन शंका निर्माण केल्या जात होत्या.
या अनुषंगाने दिनांक १०/१२/२०२४ रोजी महिला व बाल विकास, पुणे जिल्हा परिषद, पुणे.यांनी परिपत्रक जारी केले असून मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती मध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडुन आपणास कळविण्यात येईल. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये या करिता आपण आपलेस्तरावरुन तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणुन दयावी असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास, पुणे जिल्हा परिषद, पुणे.यांनी खुलासा केला आहे.त्यामुळे लाडक्या बहिणींनी अफवांवर विश्वास ठेवू नये.