अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक राज्य ) डॉ.सुरेश कुमार मेकला यांची उपस्थिती
महामार्ग पोलीसंचे ३६ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२५ संपन्न
कापूरहोळ
महामार्ग पोलीस मदत केंद्र, सारोळा व डेटविलर फार्म पॅकेजिंग इंडीया प्रायव्हेट लिमिटेड, शिरवळ - केसुर्डी एम.आय. डी.सी यांचे सयुक्त विद्यमाने ३६ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२५ चे कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ रोजी डेटविलर कंपनीत करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास डॉ. सुरेश कुमार मेकला , अप्पर पोलीस महासंचालक, वाहतूक, महाराष्ट्र राज्य,. विक्रांत देशमुख , पोलीस अधीक्षक, पुणे परिक्षेत्र, पुणे, रूपाली पाटील , पोलीस निरीक्षक, पुणे विभाग, पुणे यांचे उपस्थितीत रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमात. अप्पर पोलीस महासंचालक आणि. पोलीस अधीक्षक , यांनी वाहतुक सुरक्षा , वाहतुकीचे नियम व वाहन चालवितातना घ्यावयाची काळजी, वाहन चालविताना सिटबेल्ट लावणेबाबत व मोटार सायकल चालविताना हेल्मेटचा वापर करणेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच वाहतुक जनजागृती कार्यक्रमामध्ये एन.एच. ४८ वर तप्तरसेवा पुरविणारे तसेच कोणत्याही अपघात झालेनंतर जखमी लोकांना लागलीच उपचाराची मदत मिळावी यासाठी अविरत कार्यरत असणारी शिरवळ येथील शिरवळ रेस्क्यु टिम यांना . अप्पर पोलीस महासंचालक यांचे हस्ते एक अॅम्ब्युलन्स वितरन करण्यात आले. तसेच मोटार सयकल चालविताना अपघात झाल्यास मो.सा. चालक त्याचे बरोबर असणारे सहप्रवासी यांना डोक्यास दुखापत होवून जीव गमवावा लागतो त्यामुळे मोटार सायकल स्वार यांचे डोक्यास दुखापत होवू नये यासाठी ५०० हेल्मेट गरजु मोटार सायकल स्वार व नागरीक यांना वाटप करण्यात आले. सदर जनजागृती आणि अॅम्ब्युलन्स वितरन व हेल्मेट वाटप कार्यक्रमास हायटेक इंजिनियरींग प्रा. लि. सांगवी शिरवळ एम.आय.डी.सी. कंपनीचे संचालक दर्षण मोंडकर, . राहुल देव, संचालक डेटविलर फार्म पॅकेजिंग इंडीया प्रायव्हेट लिमिटेड, . अभिजित ताम्हणकर, शोगीनी टेक्नोआटर्स प्रा. लि., खेडशिवापुर,. रवी देशमुख, संचालक रॉयल अॅग्रो प्रा. लि., शिरवळ, . राजीव नायडू, एच. आर. डेटविलर फार्म पॅकेजिंग इंडीया प्रायव्हेट लिमिटेड, शिरवळ, . अमित भाटीया, रिजनल हेड वेस्ट झोन, पी. एस. टोल रोड, खेडशिवापुर, अमोल पाटील, एच.आर, एशियन पेंटस्, संदिप कांबळे, सेफ्टी मॅनेजर, डेटविलर फार्म पॅकेजिंग इंडीया प्रायव्हेट लिमिटेड, शिरवळ, सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार, शिरवळ रेस्क्यु टिम, पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नागरिक कार्यक्रमास ६०० ते ७०० जण हजर होते.