विघ्नहर्ता च्या मदतीतुन युवकांनी पोलीस भरतीचे केले स्वप्न साकार

Rajtorannews

मुंबई पोलिस दलामध्ये निवड झालेल्या युवकांचा नागरी सत्कार


कापुरहोळ वार्ताहर
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. बेताच्या आर्थिक परीस्थितीमुळे खेळापासुन आणि स्पर्धेपासुन गरीब होतकरू युवक वंचित राहू नये म्हणून विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या माध्यमातुन गेली पंचवीस वर्षा पासून गरजु युवकांना सर्वोतोपरी मदत व सहकार्य केले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून मागील काही महिन्यामध्ये पोलीस दल , होमगार्ड ,सरळ सेवा भरती परीक्षेत भोर तालुक्यातून व किकवी पंचकोशितील तरूणांनी आपला ठसा उमटविला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धे मध्ये पदक विजेते खेळाडू महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे मध्ये ब्रांझ पदक विजेता कुस्तीपटू अशी अनेक उदाहरणे समाजा समोर येत आहेत. असे प्रतिपादन विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे केले.

केंजळ ता. भोर येथे केंजळ येथील भुषण सुदाम बाठे यांची मुंबई पोलिस दलामध्ये निवड झाल्यामुळे ग्रामस्थ ,ग्रामपंचायत केंजळ व विघ्नहर्ता प्रतिष्ठान व पतसंस्थे च्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकात बाठे बोलत होते. पांडे ता. भोर येथील विशाखा संजय साळुंके हिची देखील मुंबई पोलीस दलामध्ये निवड बददल कौतुक करण्यात आले. सदर कार्यक्रमास भोर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आण्णासाहेव पवार तसेच माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे व माजी सभापती सुनिता बाठे यांच्या हस्ते भुषण सुदाम बाठे यांचा नागरी सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना भुषण बाठे यांनी विघ्नहर्ता प्रतिष्ठानने केलेल्या मदतीशिवाय पोलिस भरतीचे स्वप्न पुर्ण झालेच नसते असे सांगीतले.

या कार्यक्रमासाठी भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार, माजी सभापती सुनिता बाठे सरपंच कविता बाठे, उपसरपंच किरण येवले सुदाम बाठे व त्यांचे सर्व सहकारी ,ग्रामस्थ ,तरूण युवक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी विघ्नहर्ता प्रतिष्ठान किकवी केंजळ चे अध्यक्ष चंद्रकांत बाठे यांच्या माध्यमातून गरजु व होतकरू मुलांना तसेच कुस्ती स्पर्धा , क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परिक्षेसाठी विशेष मदत केली जात असून गरजू युवकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रकांत बाठे यांनी केले.
To Top