शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे बिबट्याला जीवदान

Rajtorannews

वन विभागाच्या तातडीच्या मदतीने सकाळी आकाराच्या सुमारास बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले

कापूरहोळ

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याचे शेधासाठी वन्यप्राणी भटकतो आहे.सावरदरे तालुका भोर येथील कैलास नथुराम साळुंके यांच्या विहिरीत सात महिन्याचे बिबट्याचे  बछडे विहिरीत पडल्याचे आढळून आल्यावर शेतकरी साळुंके यांनी तातडीने नसरापुर वनविभागाला सदर घटनेची माहिती दिली माहिती मिळताच वन विभागाने बावधन इको रेस्क्यू टिम व  ग्रामस्थांच्या मदतीने या बछड्याला सकाळी आकाराच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढले.

शेतीला पाणी देण्यासाठी  शेतकरी कैलास साळुंके यांनी विहीरीत डोकावले असता सदर बिबट्या विहिरीत कठड्यावर बसल्याचे दिसले. या बाबत साळुंके यांनी वनविभागास माहिती कळवली असता. नसरापुर वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी बावधन येथील इको रेस्क्यू वन्यजीव बचाव पथकाला  पाचारण केले.

तातडीने नसरापूर चे वन कर्मचारी आणि रेस्क्यू पथक व स्थानिक शेतकरी  तेथे दाखल झाले. विहिरीत पाळणा सोडून बिबट्याच्या नर जातीच्या बछड्याला सुखरूप बाहेर काढले. 

 वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी स्थानिकांना माहिती देताना जंगली प्राणी पाण्यासाठी भटकत असून  ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी जागरूक राहावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी  सहाय्यक वन सरंक्षक अधिकारी शितल राठोड , नसरापुर वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण , वनपाल संदिप जोशी ,वनरक्षक अव्दुत गुजर, वैभव कंक, तुषार कुंभार तसेच इको रेस्क्यू बावधन पथकाचे हर्षद नागरे यांची टिम व शेतकरी रूणाल पवार, निलेश गायकवाड,, बनी गायकवाड, विलास साळुंके, जगन्नाथ साळुंके, देवीदास मोरे, बबन साळुंके यांनि विशेष मदत करून बाहेर काढले.

याप्रसंगी बोलताना शेतकरी कैलास साळुंके म्हणाले की ,गेले काही  वर्षापासून बिबट्याच्या सावरदरे सारोळा परिसरात वावर दिसत होता.आहे.त्यांच्या सोबत दोन बछडे असल्याचे काही शेतकऱ्यांना दर्शन झाले होते. त्यामुळे शेतकरी वभीतीच्या सावटाखाली आहेत तरी वन विभागाने सदर घटनेची दखल घेऊन बिबट्याचे स्थलातंर करावे.

To Top