कापूरहोळ
सामाजिक जाण ठेवून दिव्यांगासाठीचा आणि निराधार महिलासाठींचा वधू वर परिचय मेळावा हा एक आगळावेगळा उपक्रम असून ही संकल्पना समाजामध्ये रुजवत आहात अशा कार्यक्रमासाठी मदतीचा हात प्रशासन म्हणून आम्ही सतत देऊ असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी, विकास खरात यांनी केले .
प्रहार अपंग क्रांती संघटना भोर , जाणता राजा प्रतिष्ठान (पुणे, महाराष्ट्र) आणि भोर , राजगड तालुका पदाधिकारी तसेच आदित्य बोरगे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व एकल (निराधार महिला) यांचा वधु वर परिचय मेळावा १६ फेब्रुवारी रोजी जानकीराम मंगल कार्यालय, नसरापूर या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी विकास खरात बोलत होते.
कार्यक्रमासाठी विकास खरात (उपविभागीय अधिकारी, उपविभाग भोर), रतनलाल हुकुमचंद गोयल अग्रेसर भगवान फाउंडेशन पुणे, शिवाजी चौंदकर (एच.आर. डब्ल्यू ओ एम कंपनी वेळू), नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस नेते अब्दुलभैया शेख, बाप्पू कुडले (अध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संघना भोर तालुका), नामदेव वालगुडे (अध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संघटना राजगड तालुका), शांताराम खाटपे, किरण रांजणे, सुवर्णा भूरूक (अध्यक्ष महिला अत्याचार संघटना पुणे जिल्हा) आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी 116 वधू वराने नावे नोंदणी केली होती.कार्यक्रमात ठरलेल्या जोडप्याचा विवाह सामुदायिक विवाह सोहळा घेऊन करण्यात येईल, तसेच हे काम आज संपले नाही. याची सुरुवात आज झाली असून नोंदणी झालेल्या सर्वांना आपण न्याय देण्याचे काम करू या साठी हे काम चालूच राहील. असे आदित्य बोरगे यांनी सांगितले. नेवासा तालुक्याचे राष्ट्रवादी नेते अब्दुल भैया शेख यांनी आपण केलेल्या उपक्रम हा माझ्या तालुक्यात देखील राबवणार असून अशा प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर झाले पाहिजे असे सांगितले.यावेळी मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाची प्रस्ताविक आदित्य बोरगे यांनी केले. तर सूत्रसंचालन विजय कव्हे यांनी केले, आभार आकाश खाटपे मानले.