दत्तात्रय नारायण गाडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मणार्थ समाजसेवकांचा सन्मान
कापूरहोळ
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज दुधाई धाराऊमाता गाडे पाटील यांचे वंशज वै. ह.भ.प.दत्तात्रय नारायण गाडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वारकरी संप्रदायाला वाहून घेतलेले सदाशिव ठोंबरे महाराज (रा.खेड ता.खंडाळा) यांना छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती व तुकाराम महाराजांचे पगडी , विणा , चिपळ्या व मानधन देऊन वारकरी भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर गोरक्षक मिलिंद एकबोटे , डाॕ.प्रवीण दबडगाव ,माजी उपसभापती विक्रम खुटवड , जिल्हा नियोजन सदस्य अमोल पांगारे व राजगड पोलीस निरिक्षक राजेंद्र गवळी यांना सन्मानित करण्यात आले.
कापुरव्होळ (ता.भोर) येथे धाराऊमाता वंशज गाडे पाटील वै. ह.भ.प.दत्तात्रय गाडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दीन संपन्न झाला. त्यावेळी युवा कीर्तनकार सुनील शिंदे महाराज यांचे जिवनामरण "आयुष्य सुंदर " किर्तन झाले. शतायुष्य, स्मरणशक्ती दांडगी व जिवन आंनदीमयी कसे जगावे हे दत्तात्रय (दादा) गाडेपाटील यांनी दाखवून दिले आहे.असे शिंदे महाराज यांनी म्हटले.
याप्रसंगी कुंभोशी गावचे सरपंच शांताराम बाठे ,मोहरी सरपंच सागर पांगारे , नारायण कोंडे. प्रविण धावले. ह.भ.प. राहुल तळेकर खंडू गाडे पाटील , तुकाराम गाडेपाटील , काशिनाथ गुरव , श्रीनाथ गाढवे , रामभाऊ रेणुसे ,अमोल गोळे , आबा हिरगुडे तसेच पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला.