अत्यल्प उत्पन्न गटातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्ययोजने अंतर्गत शासकीय अनुदानित अन्न धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व रेशन कार्ड धारकांनी या योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी आपल्या रेशनकार्डमध्ये नोंदणी केलेल्या सदस्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.अन्यथा सदर योजनेचा लाभ बंद होणार आहे.
३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत असल्याने ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानित धान्य मिळणार नाही. तसेच, ई-केवायसी न करणाऱ्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळली जातील. ई-केवायसी पूर्ण न केल्याने अन्नधान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत लाभार्थ्यांची राहील,
ई केवायसी करा ,प्रशासनाचे आवाहन
सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रास्तभाव दुकानदारांशी संपर्क करुन तात्काळ ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
भोर तालुक्यातील ४१ हजार नागरिकांचे e-KYC अद्याप अपूर्ण
भोर तालुक्यातील एकूण १ लाख १८ हजार ३३५ पैकी ४१ हजार २४८ नागरिकांचे e-KYC अद्याप पूर्ण झालेले नाही. रेशन कार्डधारकांनी अंतिम तारखेपूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंत e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा मोफत धान्याचा लाभमिळणार नाही.
तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत
आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला सहमती देता.
अधिक माहिती..!